Hera Pheri 3 – अखेर बाबू भैय्या पुन्हा ‘हेरा फेरी’ करण्यासाठी सज्ज!

Hera Pheri 3 – अखेर बाबू भैय्या पुन्हा ‘हेरा फेरी’ करण्यासाठी सज्ज!

‘हेरी फेरी’ या चित्रपटातील परेश रावल यांचे बाबू भैय्या हे पात्र चांगलेच गाजले. पहिल्या दोन भागांमधील इतर कलाकारांपेक्षा बाबू भैय्या या पात्राने चांगलाच भाव खाल्ला होता. परंतु तिसऱ्या भागासाठी मात्र अनेक चर्चांना उधाण आले होते. यातील महत्त्वाची चर्चा म्हणजे, बाबू भैय्या म्हणजेच दस्तुरखुद्द परेश रावल या चित्रपटात काम करणार की नाही? अशा अनेक प्रश्नांवर माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

परेश रावल यांनी ‘हेरा फेरी 3’ सोडल्याची बातमी आल्यानंतर चाहत्यांना खूप दु:ख झाले होते. त्यांनी चित्रपट सोडल्यानंतर, अनेक वाद निर्माण झाले. चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना चित्रपटात परतण्याचे आवाहनही केले होते. आता बातमी अशी आहे की, जे काही वाद होते ते सर्व मिटले असून, परेश रावल पुन्हा एकदा बाबू भैय्या म्हणून आपल्या समोर येणार आहेत. त्यामुळेच आता परेश रावल यांना ‘हेरा फेरी 3’ मध्ये आपल्याला पाहता येणार आहे.

परेश रावल यांनी स्वतः ही बातमी सांगितली आहे. जे काही वाद होते, ते सर्व ठीक आहे आणि ते परत येणार आहेत. द हिमांशू मेहता शो नावाच्या एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांना विचारण्यात आले की, काही वाद होता का? यावर ते म्हणाले, “कोणताही वाद नाही. माझा मुद्दा असा आहे की, जेव्हा एखादे पात्र प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत बनते. तेव्हा तुम्हाला अधिक सजग राहण्याची गरज असते.”

ते पुढे म्हणाले की, “प्रेक्षकांप्रती आपली जबाबदारी आहे, कारण प्रेक्षक इथे बसले आहेत, ते आपल्यावर खूप प्रेम करतात. तुम्ही गोष्टी हलक्यात घेऊ शकत नाही. म्हणून माझी एकच इच्छा आहे की, सर्वांनी एकत्र यावे, सर्वांनी कठोर परिश्रम करावे, दुसरे काही नाही.”

नेमका काय वाद होता?

परेश रावल यांनी चित्रपट सोडल्यानंतर, अक्षय कुमारची केप गुड या कंपनीने परेश रावल यांना 25 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली होती. यावर परेश रावल म्हणाले की, जेव्हा चित्रपटाची पटकथा तयार नसते, तेव्हा भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही. परेश रावल यांनी त्यांना साइनिंग अमाउंट म्हणून मिळालेले 11 लाख रुपये व्याजासह परत केले होते. या प्रकरणावरून बराच गोंधळ उडाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;