दहशतवादी साकीब नाचनला आज पडघ्यात दफन करणार

दहशतवादी साकीब नाचनला आज पडघ्यात दफन करणार

मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी साकीब नाचन याचा मृतदेह दिल्लीतील रुग्णालयातून आज रात्री उशिरा जेजे रुग्णालयात आणण्यात आला. साकीब नाचनवर सोमवारी सकाळी 10 वाजता पडघ्यातील कब्रस्तानामध्ये दफन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पडघ्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सिमी, इसिस यांसारख्या संघटनांचा म्होरक्या साकीब नाचन याचा मृत्यू ब्रेन स्ट्रोकमुळे दिल्लीच्या दिनदयाळ रुग्णालयात शनिवारी झाला. आज रात्री त्याचा मृतदेह मुंबईत आणला असून उद्या सकाळी तो पडघ्यात नेण्यात येणार आहे. दफनविधीला हजर राहण्यासाठी नाचन याचा मुलगा शामील नाचन याला न्यायालयाने परवानगी दिली आहे. शामील याला आयसिस मोडय़ूलप्रकरणी अटक करण्यात आली असून सध्या तो तुरुंगात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;