हुरा रे हुरा… आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे…. होरयो… कोकणात उद्यापासून शिमगोत्सवाला सुरुवात

हुरा रे हुरा… आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे…. होरयो… कोकणात उद्यापासून शिमगोत्सवाला सुरुवात

हुरा रे हुरा… आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे…. होरयो… रत्नागिरी जिल्ह्यात उद्या शिमगा साजरा होणार आहे. शिमगा हा कोकणातील प्रमुख सण आहे. गावकरी एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने शिमगा साजरा करतात. गावच्च्या एकजुटीचे दर्शन घडवणारा हा शिमगा उत्सव कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात 1 हजार 312 ठिकाणी सार्वजनिक शिमगोत्सव आणि 2 हजार 840 ठिकाणी खासगी शिमगोत्सव साजरा होणार आहे. ग्रामदेवतेच्या 1 हजार 520 पालख्या वाजतगाजत भक्तांच्या भेटीला येणार आहेत.

कोकणात शिमगोत्सवाची धूम सुरु आहे. शिमगोत्सवाची ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपली गेली आहे. गावागावात होळी उभारून गावकरी एकत्र येत जोरदार फाका देतात. हुरा रे हुरा… आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे…. होरयो… आखाडी रे आखाडी… आमच्या भगवती मातेची सोन्याची पाखाडी… अशा फाका देत शिमगोत्सव साजरा केला जातो. गावागावात ग्रामदेवतेच्या पालख्याही सजल्या आहेत. ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहात आणि वाजतगाजत साजरा केला जातो. ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी आणि हातभेटीचा नारळ देण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावी आले आहेत. चाकरमान्यांनी आता गावची घरे भरुन गेली आहेत. फाकपंचमीला गावागावात होळ्या उभ्या करून शिमगोत्सवाची सुरुवात झाली. उद्या रात्री होम पेटवून शिमगा साजरा केला जाणार आहे. रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीबुवांचा शिमगोत्सवही धुमधडाक्यात साजरा होणार आहे.

एसटीच्या तब्बल 300 गाड्या

गावच्या शिमग्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने रत्नागिरी जिल्ह्यात येतात. चाकरमान्यांसाठी एसटीने शिमगोत्सवाकरीता यंदा 300 जादा गाड्या सोडल्या आहेत. कोकण रेल्वेनेही होळी स्पेशल जादा गाड्या सोडल्या असून सर्व गाड्या फुल आहेत. अनेक चाकरमानी वेटींगवर प्रवास करत आहेत.

तिखटा सण बुधवारी

शिमगोत्सवात गोडा सण आणि तिखटा सण साजरा केला जातो. उद्या रविवार असला तरी उद्या होळी असल्याने गोडा सण साजरा होणार आहे. उद्या पुरणपोळी आणि गोडधोड पंचपक्वान्नाचा बेत आखला जाणार आहे. धुलीवंदनाच्या दिवशी तिखटे सण साजरे केले जातात. यंदा मात्र सोमवार आल्यामुळे तिखटे सण बुधवारी साजरे होणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;