तुमचे मुख्यमंत्री खंबीर आहेत, डगमगणार नाही; सुनीता केजरीवाल यांची पोस्ट

तुमचे मुख्यमंत्री खंबीर आहेत, डगमगणार नाही; सुनीता केजरीवाल यांची पोस्ट

कथित मद्यधोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. केजरीवाल यांना न्यायालयाने 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत केजरीवाल यांचा निरोप जनतेपर्यंत पोहचवला आहे. तुमचे मुख्यमंत्री खंबीर आहेत, ते डगमगणार नाहीत. त्यांचा प्रत्येक क्षण देसासाठी समर्पित आहे, असे सुनीता केजरीवाल यांनी सांगितले.

सुनीता केजरीवाल यांनी याबाबत पोस्ट केली आहे, त्यात म्हटले आहे की, तुम्ही तीन वेळा निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना मोदीजींनी सत्तेच्या अहंकारातून अटक करायला लावली. ते सर्वांना नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा दिल्लीतील जनतेचा विश्वासघात आहे. तुमचे मुख्यमंत्री नेहमीच तुमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. आत असो वा बाहेर, त्यांचे जीवन देशासाठी समर्पित आहे. जनता जनार्दनला सगळं काही माहीत आहे.’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

केजरीवाल यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, माझा जन्म संघर्षासाठीच झाला आहे. आता जनतेने सतर्क राहून देशविरोधी शक्तीविरोधात एकत्र यावे. आपला देश महान आहे. देशवासियांमध्ये ताकद आहे. फक्त सगळ्यांनी एकत्र येत देशविरोधी शक्तींविरोधात उभे ठाकायला हवे. तसेच आता तुरुंगात आहे, तर मी दिलेली आश्वासने पूर्ण होणार की नाही, याची चिंता करू नका, अशा कोणताही तुरुंग नाही, जो मला डांबून ठेऊ शकेल. मी खंबीर आहे, डगमगणार नाही. मी लवकरच तुरुंगातून बाहेर येईन आणि दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहे. तसेच जनतेची कामे होणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजपचा द्वेष करू नका. जनतेच्या कामात अडथळा निर्माण होईल, असे काहीही करू नका, असे आवाहनही केजरीवाल यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;