Shirur crime news – फिर्यादीच निघाला आरोपी, शिरूर पोलिसांनी 5 दिवसात लावला शोध
शिरूर शहरातील बाबुराव नगर येथे झालेल्या युवकाच्या खून प्रकरणी फिर्याद देणारा चुलत भाऊच मारेकरी असल्याचे निष्पन्न झाले आहे. शिरूर पोलिसांनी केवळ पाच दिवसांत गुन्ह्याचा तपास लावत आरोपी जेरबंद केला आहे. मासुम समिद आलम (मुहम्मद), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
नगर -पुणे रोडवर श्री गणेशा हॉस्पिटलच्या शेजारी भैरवनाथ कृपा सहकारी गृहरचना मर्यादित शिरुर या ठिकाणी काही परराज्यातील युवक एकत्रित राहत होते. त्यामधील मोहताब शाहिद आलम या युवकाचा 18 मार्च रोजी गळा चिरुन खून झाल्याची घटना घडली होती. शिरूर पोलिसांनी घटनेच्या तपासाची चक्रे जलद फिरवून तांत्रिक विश्लेषण करून फिर्यादी मयताचा चुलत भाऊ मासुम समिद आलम (मुहम्मद) हाच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुन्ह्यात वापरलेला चाकू, आरोपीच्या बनियनवर मिळालेले रक्ताचे डाग, बर्मुडा, चाकूसह गुंडाळून आरोपीने तो बिल्डींगच्या लिफ्टच्या डक मध्ये टाकून दिला होता. तो पोलिसांना तपासात मिळून आला आहे. या घटनेत भाऊच भावाचा वैरी निघाला असून हा खून कशासाठी केला? याचा तपास शिरूर पोलीस करीत आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस नाईक नाथा जगताप, बाळू भवर, पोलीस हवालदार नितीन सुद्रिक, पोलीस अंमलदार रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात यांच्या पथकाने केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List