यवतमाळमधील भांडेगाव येथे राजकीय नेत्यांना गावबंदी!
>> प्रसाद नायगावकर
वन्य प्राण्यामुळे यवतमाळ जिल्हातील दारव्हा तालुक्यातील भांडेगाव शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी गावातील प्रत्येक शेतकऱ्याला वॉल कंपाऊंड करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी शासन दरबारी गेल्या वर्षभरापासून लावून धरली आहे. सदर मागणीचे निवेदन राज्याचे वनमंत्री, कृषिमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनाही देण्यात आले होते .परंतु गावकऱ्यांच्या मागणीकडे शासनाने व प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केले.
अखेर गावातील शेतकऱ्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात21 मार्च पासून राजकीय नेत्यांना व लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश बंदी केली आहे. जोपर्यंत आमच्या शेताला वॉल कंपाऊंड करून मिळणार नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याला व लोकप्रतिनिधीला गावात प्रवेश देणार नसल्याचा निर्णय गावकऱ्यांनी सामूहिकरित्या घेतला आहे. तसे पोस्टरही गावाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहे.
राजकीय लोकांना निवडणूक आल्याकीच मतदार आठवतो. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांची गावबंदी चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भांडेगाव वासीयांच्या या आंदोलनाचा राजकीय नेत्यांवर काय परिणाम होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List