Kolhapur News – मुंबईत निघणार मराठीयांचा मोर्चा… सरकारा सांभाळा तुमच्या खुर्च्या… शाहीर दिलीप सावंत यांचा शाहिरीतून सरकारला फटका

Kolhapur News – मुंबईत निघणार मराठीयांचा मोर्चा… सरकारा सांभाळा तुमच्या खुर्च्या… शाहीर दिलीप सावंत यांचा शाहिरीतून सरकारला फटका

हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राविरोधात येत्या 5 जुलै रोजी मुंबईमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र मोर्चा काढत आहेत. मराठी माणसाला यामुळे जिकडे तिकडे बळ मिळताना दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात या मोर्चाची उत्कंठा लागून राहिली आहे. कोल्हापूरही त्याला अपवाद राहिले नाही.

कोल्हापूरचे प्रसिद्ध शिवशाहीर दिलीप सावंत यांनी तर या मोर्चावर “मुंबईत निघणार मराठीयांचा मोर्चा… सरकारा सांभाळा तुमच्या खुर्च्या ” हा पोवाडा रचून, सरकारला झटका देत, मराठी माणसांच्या मनगटात ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईमध्ये मोर्चात जाऊन पोवाडा सादर करण्याचाही त्यांचा मानस असून, तत्पूर्वी व्हिडीओतून सोशल मीडियाच्या माध्यमातून हा पोवाडा व्हायरल करण्यात येत असल्याचे शाहीर दिलीप सावंत यांनी दैनिक सामनाशी बोलताना सांगितले.

मुंबईत निघणार मराठीयांचा मोर्चा
सरकारा सांभाळा तुमच्या खुर्च्या

मराठी माणूस आता हो लढणार
मुंबईत वादळथेट धडकणार
साऱ्या जगात एकच चर्चा
सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या

हिंदीची सक्ती नाही हो चालणार
मराठे अन्याय सहन नाही हो करणार
तुम्हा झोंबणार कोल्हापूरच्या मिरच्या
सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या

पहिलीचौथी मुलांवर किती हे ओझे
हिंदी लादून खाता का मताचे खाजे
शिक्षणमंत्री वाटू नका पर्च्या
सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या

धमन्यात भिनलया शिवाजी राजं
संयुक्त लढ्याच रक्त आहे ताजं
बाता करू नका आता वरच्या
सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या

ठाकरे बधूंचा आवाज घूमणार
मराठी माणूस बाहेर पडणार
कशा पाई वेळ करता खर्च्या
सरकार साभांळा तुमच्या खुर्च्या

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;