Lok Sabha Election 2024 – उमेदवारी मिळवण्यासाठी कुख्यात गँगस्टरनं 60व्या वर्षी केलं लग्न
लोकसभा निवडणुकीची देशभरात धामधुम सुरू आहे. यासाठी उमेदवारी मिळावी यासाठी नेते नाना प्रकारची शक्कल लढवत आहेत. असाच एक प्रकार बिहारमधील नवादा जिल्ह्यातून समोर आली आहे. नालंदा येथील बाहुबली आणि कुख्यात गँगस्टर अशोक महतो यांनी वयाच्या 60व्या वर्षी लग्न केले असून यामागील कारणही आता उघड झाले आहे.
अशोक महतो यांनी मंगळवारी रात्री पाटणा जिल्ह्यातील बख्तियारपूरमधील एका मंदिरामध्ये लग्न केले. कुमारी अनिता असे अशोक यांच्या पत्नीचे नाव आहे. ती अशोक यांच्यापेक्षा वयाने 16 वर्षांनी लहान आहे.
बिहारच्या मुंगेर मतदारसंघातून अशोक महतो आपले नशीब आजमावू इच्छितात. परंतु आपला उमेदवाीर अर्ज बाद होईल अशी त्यांना भीती आहे. त्यामुळे त्यांनी गडबडीत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाआधी अशोक महतो यांनी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांनी पत्नी राबडी देवी यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.
अशोक महतो यांच्या पत्नी कुमारी अनिता यांना मुंगेर मतदारसंघातून तिकीट मिळणे जवळपास निश्चित आहे. त्यांची थेट लढत जेडीयूचे विद्यमान खासदार राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांच्याशी होईल.
अशोक महतो हे जेल ब्रेक कांडमध्ये 17 वर्ष तुरुंगात होते. गेल्या वर्षीच त्यांची सुटका झाली. नियमानुसार दोन वर्षांहून अधिक शिक्षा भोगलेल्या व्यक्तीला सुटकेनंतर पुढील 6 वर्ष निवडणूक लढता येत नाही. त्यामुळे अशोक यांनी लग्न करत पत्नीला तिकीट मिळवून दिले. अर्थात उमेदवारीबाबत अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंगेर मतदारसंघातून महतो यांच्या पत्नीलाच तिकीट मिळणे निश्चित आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List