केदारनाथ यात्रेला मुसळधार पावसाचा फटका

केदारनाथ यात्रेला मुसळधार पावसाचा फटका

उत्तराखंडमधील पवित्र तीर्थस्थान केदारनाथ धामची यात्रा सध्या सुरू आहे. बुधवारी या भागात मुसळधार पाऊस पडला. यामुळे चार तास यात्रा स्थगित करण्यात आली. मुनकटिया डोंगराळ भागात सातत्याने भूस्खलन होत असल्यामुळे रस्त्यावर मातीचा ढिगारा पडत आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून जाताना भाविकांना अडचणी येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने सोनप्रयाग ते गौरीकुंड यात्रा तात्पुरती थांबवली. केदारनाथ यात्रेला आलेल्या भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. मुसळधार पावसात पायी जाणाऱ्या मार्गावर दगड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे चार तास यात्रा थांबवण्यात आली होती. केदारनाथ हायवे काकडा गादमध्येही लागोपाठ भूस्खलन होत आहे. कुठे काही दुर्घटना घडली की नाही, यासाठी काही मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत घेतली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;