मुलुंडच्या आयईएस शाळेकडून पालकांची लूट, व्याजमुक्त ठेवी भरण्यासाठी दबाव; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने विचारला जाब

मुलुंडच्या आयईएस शाळेकडून पालकांची लूट, व्याजमुक्त ठेवी भरण्यासाठी दबाव; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने विचारला जाब

मुलुंडच्या आयईएस शाळेकडून पालकांची लूट सुरू आहे. अचानकपणे पाचवीच्या प्रवेशाकरिता व्याजमुक्त ठेवी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकण्यात येत होता. पालकांच्या तक्रारीनंतर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने दादर येथील मुख्यालयात जाऊन शाळेच्या व्यवस्थापनाला जाब विचारला. त्यानंतर या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन व्यवनस्थापनाकडून देण्यात आले. त्यामुळे पालकांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

मुलुंड येथील आयईएस शाळेच्या विद्यार्थ्यांकडून अचानकपणे पाचवीच्या प्रवेशाकरिता व्याजमुक्त ठेवी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकण्यात येत होता. यासंदर्भात पालकांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे तक्रारी केल्या होत्या. शिवसेना नेते – खासदार आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाचे सचिव निखिल सावंत यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाची दादर येथील मुख्य कार्यालयात भेट घेतली. पालकांकडून ज्युनिअर केजीच्या प्रवेशा वेळी डेव्हलपमेंट फंड म्हणून याआधी रक्कम घेण्यात आली आहे. तरीही पुन्हा पाचवीच्या प्रवेशासाठी व्याजमुक्त ठेवी वसूल करणे चुकीचे आहे, असे शिष्टमंडळाने या बैठकीत निदर्शनास आणून दिले.

सकारात्मक तोडगा काढू 

ग्राहक संरक्षण कक्षाने दिलेल्या निवेदनावर त्वरित विश्वस्त मंडळाची बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढू व पालकांची कोणत्याही प्रकारे लूट होणार नाही, असे आश्वासन इंडियन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सतीश लोटलीकर, सतीश नायक व सामंत यांनी दिले. या वेळी शिष्टमंडळात कक्षाचे खजिनदार देविदास माडये, कक्ष कार्यालय चिटणीस प्रशांत पाताडे, राजेश चव्हाण, प्रसारक सतीश नाटेकर, उपसंघटक विजय पवार, समीर  मालणकर, हितेश जाधव, प्रभाकर बोलम, अनंत सावंत तसेच पालकदेखील उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;