साक्रीत भाजपच्या नगराध्यक्षांच्या विरोधात स्वपक्षीय नगरसेवकांचेच बंड

साक्रीत भाजपच्या नगराध्यक्षांच्या विरोधात स्वपक्षीय नगरसेवकांचेच बंड

भाजपच्या निष्क्रीय नगराध्यक्षांविरोधात आज साक्री नगरपंचायतीमध्ये भाजपच्याच नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव आणल्याने मिधे गट व भाजपवर नामुष्की ओढावाली. अर्थात सत्तेला नाचवणाऱ्या राजकारण्यांनी त्यातून मधला मार्ग काढत प्रसंग तारला असला तरी सत्ताधाऱ्यांची आब्रू वेशीला टांगलेली सगळ्यांनीच पाहिली. पीठासीन अधिकारी प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहिल्याने तूर्त प्रस्ताव बारगळला  असला तरी पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रस्तावाला खो दिल्याची चर्चा रंगली होती.

साक्री नगरपंचायतीच्या अध्यक्षा जयश्री पवार यांच्या विरोधात दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावावर विशेष सभा घेण्यासाठी पीठासीन अधिकारी असलेले प्रांत अधिकारी रोहन कुवर कामकाजासाठी आलेच नाहीत. त्यामुळे विद्यमान उपनगराध्यक्ष बापू गीते यांच्यासह भाजपच्या सहा नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;