नियंत्रण कक्षाला सलग 22 कॉल, महिला अंमलदाराशी अश्लील भाष्य; एक्सप्रेसमध्ये पाणी विकणाऱ्याचे कृत्य

नियंत्रण कक्षाला सलग 22 कॉल, महिला अंमलदाराशी अश्लील भाष्य; एक्सप्रेसमध्ये पाणी विकणाऱ्याचे कृत्य

सलग 22 वेळा पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून तो महिला अंमलदाराशी अत्यंत घाणेरड्या शब्दांत बोलला. मग फोन बंद करून सिम कार्ड फेकून दिले. असे असतानाही आझाद मैदान पोलिसांनी अचूक तपास करत एक्सप्रेसमध्ये चीप्स आणि पाणी विकणाऱ्या आरोपीला पकडले.

17 जानेवारीला एकापाठोपाठ 22 कॉल मुख्य नियंत्रण कक्षात धडकले. हे सर्व कॉल एकाच महिला पोलीस अंमलदाराकडे गेले. त्यांनी कॉल उचलल्यानंतर समोरची व्यक्ती निव्वळ घाणेरडे बोलायची. त्यामुळे याची गंभीर दखल घेत त्या अंमलदार महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी त्या नंबरवरून कॉलरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण मोबाईल नंबर बंद होता, शिवाय सिम कार्डदेखील चालू नव्हते. त्यामुळे कॉलरचा शोध घेणे मुश्किल झाले होते. उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ निरीक्षक दीपक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कलुबरगे, तडीपार अधिकारी रामप्रसाद चंदवाडे, महिला उपनिरीक्षक शारदा चोंधे तसेच दीपक पवार, सचिन पाटील यांनी त्याला शोधून काढायचा चंग बांधला होता.

यूपीच्या तरुणाचा मोबाईल चोरून कॉल

तोच धागा पकडून पोलिसांनी त्याचा फोटो मिळवला आणि मानवी कौशल्याच्या आधारे शोध सुरू केला. ठाणे ते पुणे दरम्यान धावणाऱ्या सर्व एक्सप्रेस तपासल्यानंतर आरोपी सिद्धेश्वर यादव (20) याला पुणे स्थानकातून उचलले. त्याने यूपीच्या एका तरुणाचा मोबाईल चोरून त्या नंबरवरून 22 कॉल केल्याचे सांगितले. त्याला अटक केल्यानंतर कोर्टाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;