विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा, शिक्षकांना निवडणूकपूर्व कामात जुंपू नका! शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा, शिक्षकांना निवडणूकपूर्व कामात जुंपू नका! शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

निवडणूकपूर्व कामाकरिता अनेक शाळांमधील शत-प्रतिशत शिक्षकांच्या सेवा सक्षम अधिकाऱ्यांनी अधिग्रहित केल्या आहेत. या आदेशामुळे शिक्षक भयभीत झाले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने पालक चिंताग्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर सदरचे आदेश तातडीने मागे घ्यावेत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांना निवडणूकपूर्व कामामध्ये जुंपू नये, अशी मागणी शिवसेनेने उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार, शिक्षकांना आपली शैक्षणिक कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडता यावी यासाठी त्यांच्याकडे निवडणुकीसह कोणतेही अशैक्षणिक काम सोपवू नये. शैक्षणिक वर्षाला नुकताच प्रारंभ झाला आहे. शिक्षकांना सोपवण्यात आलेला कार्यभार त्यांना शालेय परिसरात 7 ते 8 तास व्यतीत करण्यास भाग पाडणार आहे. 80 टक्क्यांहून अधिक शिक्षक मुंबईबाहेरील ठिकाणाहून 2 ते 3 तासांचा प्रवास करून शाळेत पोहोचतात. त्यामुळे त्यांना निवडणूकपूर्व कामाकरता वेळ देणे शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला कारणीभूत ठरणारे कोणतेही कार्य अशैक्षणिक असून ते शिक्षकांना पार पाडण्यास भाग पाडणे चुकीचे आहे, असे शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवडणुकीवेळी जबाबदारी पार पाडण्यास शिक्षक तत्पर

निवडणुकीच्या वेळी सर्व प्रकारच्या सेवा देण्यास कोणतेही शिक्षक नकार देणार नाहीत. प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष निवडणुकीची जबाबदारी राष्ट्रीय कर्तव्यभावनेतून पार पाडण्यास शिक्षक तत्पर असतात आणि यापुढेही राहतील. मात्र, सध्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपण अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश द्यावेत आणि शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित करण्याची कार्यवाही राष्ट्राच्या कायद्याविरुद्ध आणि राष्ट्रीय धोरणाविरुद्ध ठरणार असल्याची त्यांना जाणीव करून द्यावी, अशी विनंतीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;