तुझ्याशिवाय या प्रवासाला अर्थ उरला नसता! अंतराळ उड्डाणाआधी पत्नीचे आभार मानताना शुभांशु शुक्ला भावुक

तुझ्याशिवाय या प्रवासाला अर्थ उरला नसता! अंतराळ उड्डाणाआधी पत्नीचे आभार मानताना शुभांशु शुक्ला भावुक

‘तुझ्या अस्तित्वाने आणि सहवासाने माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला अर्थ दिला. तुझ्याशिवाय हे मिशन शक्य झालं नसतं. त्याहून महत्त्वाचं म्हणजे तुझ्याशिवाय या प्रवासाला अर्थही उरला नसता.’ हे उद्गार आहेत नासाच्या ऑक्सिऑम-4 मोहिमेअंतर्गत आज अतंराळात झेपावलेले भारतीय हवाई दलातील ग्रुप पॅप्टन शुभांशु शुक्ला यांचे. अंतराळातील ऐतिहासिक उड्डाणाच्या आधी पत्नी कामना शुक्ला हिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी एक भावनिक पोस्ट त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली.

इन्स्टावरील या पोस्टमध्ये शुभांशु शुक्ला यांनी कुटुंब व मित्रमंडळींचेही आभार मानले. ’हा क्षण प्रत्यक्षात आणण्यासाठी माझ्या मागे आधारस्तंभ बनून राहिलेलं माझं कुटुंब आणि मित्रांचे खूप खूप आभार. अनेकदा जवळचे लोक आपल्यासाठी मोठा त्याग करतात, पण आपल्याला त्याची कल्पना नसते. किंवा हा त्याग आपल्याला नीट समजत नाही. तरीही केवळ आपल्या प्रेमापोटी ते हे सगळं करत असतात,’ असे शुभांशु यांनी म्हटले आहे.

पत्नीबद्दल लिहिताना ते अधिकच भावूक झाले. ’माझी अद्भुत जोडीदार’, असा उल्लेख करत त्यांनी आपल्या पत्नीचे विशेष आभार मानले. तुझ्याशिवाय हे मिशन शक्य झालं नसतं. किंबहुना तुझ्या पाठिंब्याशिवाय माझ्या या प्रवासाला काही अर्थही उरला नसता, असे शुभांशु यांनी म्हटले आहे. हे लिहिताना त्यांनी पत्नीसोबतचा एक खास पह्टो शेअर केला आहे. या पह्टोत शुभांशु आणि त्यांची पत्नी कामना हे दोघे एका काचेच्या दोन विरुद्ध बाजूला उभे असून एकमेकांना गुडबाय करताना दिसत आहेत. हा पह्टो म्हणजे शारीरिक दुरावा आणि भावनिक जवळीकीचं प्रतीक आहे.

मी कृतज्ञ आहे!

’कोणीही एकटा अंतराळात जाऊ शकत नाही. कुटुंबातील आणि समाजातील अनेक लोकांच्या पाठिंब्यामुळंच हे सगळं शक्य होतं. त्या सगळ्यांबद्दल मी कृतज्ञ आहे,’ असे त्यांनी पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;