शीव उड्डाणपूल वर्षभरानंतर वाहतुकीसाठी खुला केला जाणार

शीव उड्डाणपूल वर्षभरानंतर वाहतुकीसाठी खुला केला जाणार

मुंबई शहर आणि उपनगरांतील उड्डाणपुलांच्या रखडलेल्या कामांना पालिकेकडून गती देण्यात येणार आहे. त्यानुसार बहुप्रतीक्षित शीव उड्डाणपूल वर्षभराने म्हणजेच 31 मे 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. तसेच मुंबई सेंट्रल येथील बेलासिस उड्डाणपुलाच्या कामासाठी 15 डिसेंबरची डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे.

शीवच्या पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणारा शीव उड्डाणपूल तसेच ताडदेव ते नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल या दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. उड्डाणपुलांचे काम रखडल्यामुळे वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी शीव आणि बेलासिस या दोन्ही उड्डाणपुलांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱयांना दिले. उड्डाणपुलांची कामे वेगाने आणि योग्य नियोजन करा. वेळीच कामे पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा सूचनाही बांगर यांनी केल्या. त्यांनी दोन्ही उड्डाणपुलांच्या कामांची पाहणी केल्यानंतर आढावा घेण्यासाठी पालिका मुख्यालयात बैठक घेतली होती.

पुलाच्या कामाचे नियोजन

शीव उड्डाणपुलाच्या दक्षिण बाजूकडील पादचारी पुलाचे काम रेल्वेमार्फत 31 ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण केले जाईल.
त्यानंतर मुख्य पुलाच्या दक्षिणेकडील भागाच्या तोडकामाला सुरुवात केली जाईल.
याचदरम्यान पुलाखालील जुन्या पुलाच्या भिंतीचे तोडकाम सुरू केले जाईल. जानेवारीपर्यंत गर्डर बसवण्यात येतील.
पश्चिमेकडील पोहोच मार्ग अधिक महत्त्वाचा आहे. त्याचे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल.
1 ऑक्टोबर 2025 पासून दुसऱया भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येईल.

वाहतूककोंडीचा मनस्ताप

100 हून अधिक वर्षे जुन्या शीव उड्डाणपुलावरुन मोठय़ा प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरु असायची. आयुर्मान संपलेल्या या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम महापालिकेने हाती घेतले. यासोबतच बेलासिस आणि कर्नाक पुलाचेही बांधकाम केले जात आहे. एकाचवेळी तीन पुलांचे काम सुरु असल्याने त्याचा शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शीव उड्डाणपुलासाठी मे 2026 ची नवी डेडलाईन निश्चित केल्याने मुंबईकरांना आणखी वर्षभर वाहतूककाsंडीचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

बेलासिस उड्डाणपूल याच वर्षी पूर्ण होणार

बेलासिस पुलाच्या प्रकल्पासाठी यापूर्वी एप्रिल 2026 ची डेडलाईन निश्चित केली होती. मात्र त्या नियोजित कालावधीपूर्वीच डिसेंबर 2025 अखेरपर्यंत पूल वाहतुकीस खुला करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

पुलाच्या प्रकल्पात अडथळा ठरणारी 13 बांधकामे हटवून तेथील रहिवाशांना पर्यायी घरांचे वाटप करण्यात आले आहे.
हा पूल उभारण्यासाठी 12 गर्डर टाकण्यात येणार आहेत. 15 डिसेंबर 2025 पर्यंत पुलाचे संपूर्ण काम पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Onion Peel Benefits – कांद्याच्या सालींमध्ये दडलाय आरोग्य आणि सौंदर्याचा खजिना, वाचा Onion Peel Benefits – कांद्याच्या सालींमध्ये दडलाय आरोग्य आणि सौंदर्याचा खजिना, वाचा
अनेकदा आपण भाज्या कापताना कांद्याच्या साली निरुपयोगी समजून फेकून देतो. परंतु याच कांद्याच्या साली आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. खासकरुन आपल्या...
ताडोबातील वाघांकडून सांबरांची सर्वाधिक शिकार, बिबट्यांची पसंती रानडुकरांना
मोठ्या आवाजात गाणी लावल्याने आई ओरडली, अल्पवयीन मुलाने घेतला आईचा जीव
पावसाळ्यात ‘या’ भाज्यांपासून चार हात दूर राहा, नाहीतर आजारी पडाल! वाचा सविस्तर
मक्यापासून बनवलेले 5 पदार्थ पावसाची मजा द्विगुणित करतील
अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास…
फक्त एक महिना ‘ही’ भाजी खाल तर वर्षभर निरोगी राहाल, अनेक आजारांवर गुणकारी