घोषित आणि अघोषित आणीबाणीत फरक, शरद पवार यांचा सणसणीत टोला

घोषित आणि अघोषित आणीबाणीत फरक, शरद पवार यांचा सणसणीत टोला

घोषित आणीबाणी आणि अघोषित आणीबाणी यात फरक असतो. हा फरक काय आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. पुन्हा सावध राहण्याचा काळ आला आहे, असे परखड मत मांडतानाच आम्ही काय वाट्टेल ती किंमत देऊ, पण संसदीय लोकशाहीचा देश अखंड राहील, हा दृष्टिकोण पुढे घेऊन उभे राहू, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.

आज बातमीतील मत सरकारच्या विरोधी असेल तर त्या वृत्तपत्राला, त्या पत्रकाराला सरकारच्या मुख्यालयातून पह्न येतात. ही बातमी अशी छापू नका. विरोधात बातमी लावायचीच असेल आणि नंतर काही झाले तर आमच्याकडे येऊ नका, अशी धमकी दिली जाते, असे शरद पवार म्हणाले.

आणीबाणी लावली. इंदिरा गांधी यांना दोष दिला गेला. हे सर्व खरे आहे. पण पराभव झाल्यावर इंदिरा गांधी यांनी देशाची क्षमा मागितली ही गोष्ट विसरता कामा नये. नंतर पुन्हा जनतेने त्यांना संधी दिली. देशातील चित्रही बदललं.

आणीबाणीला बाळासाहेब देवरसांचे समर्थन होते

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते. तसेच जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशी आरएसएसचा संबंध नाही, असेही त्यांनी जाहीर केले होते. भाजपाला बाळासाहेब देवरसांची भूमिका मान्य नाही का, असा सवाल काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;