राज्य मानांकन पॅरम स्पर्धेत राहुल, समृद्धीला विजेतेपद

राज्य मानांकन पॅरम स्पर्धेत राहुल, समृद्धीला विजेतेपद

श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित नवव्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत मुंबईच्या राहुल सोलंकीने ठाण्याच्या झैद अहमदला 21-17, 21-5 सरळ दोन सेटमध्ये हरवून एकतर्फी विजय नोंदविला. पुरुषांच्या तिसऱया क्रमांकासाठीच्या लढतीत रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाणने मुंबईच्या विकास धारियाला 24-13, 0-25 व 25-10 असे नमविले. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने बाजी मारली. तिने मुंबईच्या अंबिका हरिथवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात 20-25, 16-8, 25-10 असा विजय मिळवून या गटाचे विजेतेपद पटकावले. या गटातील तिसऱया क्रमांकासाठी झालेल्या लढतीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणवर 11-10, 21-8 अशी सहज मात केली.

स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा कुरुंदवाडचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आणि नृसिंह सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थेचे अध्यक्ष वैभव पुजारी, महाराष्ट्र कॅरमचे सचिव अरुण केदार, अजित सावंत, केतन चिखले यांच्या उपस्थितीत पार पडला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;