पित्याने मुलाच्या मदतीने रचला चोरीचा कट, एमएचबी पोलिसांकडून 72 तासांत छडा

पित्याने मुलाच्या मदतीने रचला चोरीचा कट, एमएचबी पोलिसांकडून 72 तासांत छडा

तेरा किलो सोने चोरी करून पळून गेलेल्या तिघांना एमएचबी पोलिसांनी अवघ्या 72 तासांत अटक केली. जिग्नेश कुछडिया, यश जिवाभाई ओडेदरा आणि नाथाभाई कुछडिया अशी त्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 11 कोटीचे दागिने जप्त केले आहेत. नाथाभाईने जिग्नेशच्या मदतीने चोरीचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. ते तिघे गुजरातचे रहिवाशी आहेत.

गुजरात येथे गोल्ड अँड डायमंड कंपनी आहे. ती पंपनी दक्षिण हिंदुस्थानात सोने खरेदी करते. त्या कंपनीत अजय घागडा हा काम करत होता. चार दिवसांपूर्वी अजय आणि जिग्नेश या दोघांनी सोन्याचे दागिने विक्रीसाठी दिले होते. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथे विक्री केल्यानंतर ते बोरिवली येथे आले. बोरिवली येथील फ्लॅटवर आराम करून ते गुजरातला जाणार होते. तेव्हा संधी मिळताच जिग्नेशने सोन्याचे दागिने असलेली बॅग घेऊन पळ काढला. हा प्रकार अजयच्या लक्षात आला. याची माहिती त्याने मालकाला दिली. त्यानंतर त्याने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. परिमंडळ 11चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड, सहाय्यक निरीक्षक बाबुलाल शिंदे आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी पिथाडिया टोलनाक्यावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये जिग्नेश हा नाथाभाईसोबत कारने जात असल्याचे दिसले. पोलिसांनी पाठलाग करून जिग्नेश आणि यशला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत नाथाभाईचे नाव समोर आले. त्यालादेखील पोलिसांनी अटक केली. त्या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;