जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचाराची खोली 800 कोटींनी वाढली; अधिकाऱ्यांच्या घरांवर सीबीआयच्या धाडी

जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचाराची खोली 800 कोटींनी वाढली; अधिकाऱ्यांच्या घरांवर सीबीआयच्या धाडी

जेएनपीएच्या समुद्र चॅनलची खोली वाढवण्यासाठी दोन टप्प्यांत झालेल्या कामात सुमारे 800 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल करून जेएनपीए आणि ठेकेदार कंपनीतील अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर आणि घरावर धाडी टाकल्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे जेएनपीएच्या अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

जेएनपीएने 15 मीटरपर्यंत ड्राफ्ट असलेली मालवाहू जहाजे बंदरात लॅण्ड करण्यासाठी समुद्र चॅनलची खोली वाढवण्याचे काम दोन टप्प्यांत सुरू केले होते. 2003 ते 2014 व 2013 ते 2019 या वर्षांत दोन टप्प्यांतील कामांच्या खर्चासाठी जेएनपीटीएने सुमारे तीन हजार कोटींची तरतूद केली होती. या कामांच्या कन्सल्टन्सीचे काम टीसीई कंपनीला दिले होते. समुद्र चॅनलची खोली वाढवण्याचे काम जॉइंट व्हेअरमधील बोस्कलिस स्मित इंडिया व एलएलपीला जान दे नुल ड्रेसिंग इंडिया प्रा.लि. (बीएसआय-जेडीएन) या दोन कंपन्यांना देण्यात आले होते. या दोन टप्प्यांतील तीन हजार कोटी खर्चाच्या ड्रेजिंगच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. या ड्रेजिंगचे प्रत्यक्षात काम न करताही ठेकेदार कंपन्यांनी खोटे दावे करून जेएनपीएला 800 कोटींचा चुना लावला आहे.

मुंबई, चेन्नईत धाडसत्र
सीबीआयने याप्रकरणी जेएनपीटीचे तत्कालीन मुख्य अभियंता सुनीलकुमार मदभावी, टीसीईचे तत्कालीन प्रकल्प संचालक देवदत्त बोस, बोस्कलिस स्मिट इंडिया एलएलपी, जान दे नुल ड्रेजिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास कामाला सुरुवात केली आहे. याप्रकरणी चौकशीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांच्या जेएनपीए, मुंबई, चेन्नई येथील घरी, कार्यालयावर शुक्रवारी धाडीही टाकण्यात आल्या आहेत.

लाच दिली नाही म्हणून बिले थांबवली
समुद्राची खोली वाढवण्याच्या कामासाठी जेएनपीएने जागतिक बँकेकडून कोट्यवधींचे कर्जही घेतले होते. समुद्राची खोली वाढवण्याच्या कामापोटी थेट मंत्र्यांच्या नावाने काही अधिकाऱ्यांनी मलईची मागणी केली होती. मात्र ठेकेदार कंपन्यांनी मागणीला दाद दिली नाही. यामुळे दरम्यानच्या काळात या ठेकेदार कंपनीची शेकडो कोटींची बिले होल्ड करून ठेवण्यात आली होती. बिले होल्ड करून ठेवण्याच्या जेएनपीएच्या या कृतीविरोधात कंपन्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले असल्याचे सूत्राकडून सांगण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;