शेतकऱ्यांनी कर्ज फेडलेच पाहिजे, कृषिमंत्री कोकाटे पुन्हा बरळले

शेतकऱ्यांनी कर्ज फेडलेच पाहिजे, कृषिमंत्री कोकाटे पुन्हा बरळले

कर्जाच्या बोझाखाली दबलेला शेतकरी आत्महत्या करतोय, पण सरकारला आणि कृषिमंत्र्यांना काहीच दया येत नाही. शेतकऱयांबद्दल सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज कर्जमाफीच्या मुद्दय़ावरून पुन्हा बरळले. शेतकऱयांनी कर्ज फेडलेच पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केल्याने शेतकरी वर्गात संताप निर्माण झाला आहे.

सत्तेवर आल्यानंतर शेतकऱयांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन महायुतीने दिले होते, परंतु सत्ता मिळून सहा महिने उलटले तरी महायुती सरकारने त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱयांच्या कर्जमाफीबद्दल योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे वक्तव्य केले होते. कृषिमंत्री कोकाटे यांनीही कर्जमाफीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच आहे असे सांगत त्यातून हात झटकतानाच शेतकऱयांनी कर्ज फेडलेच पाहिजे, असे वक्तव्य आज केले. शेतीवर अवलंबून असणारा वर्ग कमी होत चालला आहे. कारण शेती परवडत नाही. याचे कारण शेतकऱयांना शाश्वत शेतीमालाचे दोन पैसे मिळतील अशी व्यवस्था सरकार म्हणून आम्ही करू शकलो नाही, अशी जाहीर कबुली त्यांनी दिली.

दूध व्यवसायात गुजरातचे अतिक्रमण

कोकाटे यांनी या वेळी महाराष्ट्रातील दूध व्यवसायात गुजरातचे अतिक्रमण होत असल्याचेही सांगितले. राज्यातील शेतकरी दूध संस्था स्थापन करण्यास तयार नाही. खासगी डेअरींमधून शेतकऱयांना अधिक पैसे मिळतात. त्यात गुजरातमधील खासगी डेअरींचे अतिक्रमण होत आहे असे ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;