परिसर खचू लागल्याने ‘राजकोट’ बंद

परिसर खचू लागल्याने ‘राजकोट’ बंद

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱयाजवळ भगदाड पडल्यानंतर आसपासचा परिसर खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. चबुतऱयाजवळील डागडुजी व दुरुस्ती पूर्ण झाल्याशिवाय तिथे कुणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला पुतळा कोसळल्यानंतर तिथे दुसरा 83 फूट उंच पुतळा उभारण्यात आला. त्यासाठी 100 कोटी रुपये खर्च केला गेला. महाराजांचा पुतळा 100 वर्षे टिकेल, असा दावा उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता; परंतु महिनाभरातच चबुतऱयाजवळ भगदाड पडले. चबुतऱयाच्या किनाऱयालाही तडे गेले. निकृष्ट बांधकामामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप होत आहे.

दोषी अधिकाऱयांवर तातडीने कारवाई करा, शिवसेनेची मागणी

समुद्रापासून राजकोट किल्ला दूर आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्यापासून किल्ला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला धोका नाही. मात्र पुतळय़ाच्या परिसरात झालेले बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे परिसर खचत आहे. त्यामुळे पुतळय़ाला धोका निर्माण झाला आहे. हे निकृष्ट बांधकाम करणाऱया अधिकाऱयांवर सरकारने तातडीने व कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;