दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना श्रीनगरमधून अटक, पहलगाम हल्ला

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना श्रीनगरमधून अटक, पहलगाम हल्ला

जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये अतिशय क्रूरपणे हल्ला करून 26 पर्यटकांचा बळी घेणाऱया दहशतवाद्यांना आश्रय देणाऱया दोघांना एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देण्यासह त्यांना विविध प्रकारची रसद पुरवल्याच्या आरोपाखाली दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बटकोट येथील परवेज अहमद जोथार आणि हिल पार्क येथील बशीर अहमद जोथार अशी या दोघांची नावे असून या दोघांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख उघड केली आहे. तीन दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असून पाकिस्तानी नागरिक असल्याची माहितीही दोघांनी एनआयएच्या तपासादरम्यान दिली आहे. परवेझ आणि बशीर यांनी तीन सशस्त्र दहशतवाद्यांना हिल पार्क येथील झोपडीत जाणूनबुजून आश्रय दिल्याचे एनआयएच्या अधिकाऱयांनी सांगितले. या दहशतवाद्यांना दोघांनी अन्न, निवारा आणि आवश्यक सर्व जीवनावश्यक वस्तू पुरवल्याचे तपासात समोर आल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले.

3 हल्लेखोर पाकिस्तानी

अनंतनाग पोलिसांनी तीन दहशतवाद्यांचे स्केच जारी केले होते. अनंतनागचा आदिल हुसेन ठोकर, हाशिम मुसा ऊर्फ सुलेमान व अली अर्फ तल्हा, मुसा आणि अली पाकिस्तानी असून मुसा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये कमांडो म्हणून कार्यरत होता. यातील कोणत्या तीन दहशतवाद्यांना आरोपींनी आश्रय दिला होता हे स्पष्ट झालेले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;