सीरियात चर्चमध्ये आत्मघातकी हल्ला, 15 ठार; 13 जण गंभीर जखमी
सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये रविवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 15 जण ठार तर 13 जण गंभीर जखमी झाले. ड्वेला येथील एलियास चर्चमध्ये लोकं प्रार्थना करत असताना हल्लेखोराने स्वतःला बॉम्बने उडवून दिले. मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. सीरियाच्या सरकारी माध्यमांनी याला भ्याड दहशतवादी हल्ला म्हणून वर्णन केले आहे. तथापि, अद्याप कोणत्याही संघटनेने या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
घटनेनंतर सुरक्षा दल आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. हा हल्ला सीरियातील आतापर्यंतच्या हल्ल्यातील सर्वात मोठा आत्मघाती हल्ला आहे. या हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List