पहलगाम दहशतवादी हल्ला; NIA ची मोठी कारवाई, दोन जणांना अटक
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठे यश मिळवले आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात 25 पर्यटक आणि एका स्थानिक व्यक्तीचा समावेश होता. एनआयएने या प्रकरणी पहलगाम येथील दोन स्थानिक व्यक्तींना अटक केली आहे. या दोघांनी हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना आश्रय आणि इतर सुविधा पुरवल्याचा आरोप आहे.
अटक केलेल्या व्यक्तींची नावे परवेझ अहमद जोथर (बटकोट, पहलगाम) आणि बशीर अहमद जोथर (हिल पार्क, पहलगाम) अशी आहेत. एनआयएच्या तपासातून असे समोर आले आहे की, या दोघांनी हल्ल्यापूर्वी हिल पार्क येथील एका झोपडीत तीन सशस्त्र दहशतवाद्यांना जाणीवपूर्वक आश्रय दिला होता. याशिवाय, त्यांनी दहशतवाद्यांना अन्न, निवारा आणि इतर लॉजिस्टिक सपोर्ट पुरवला होता. एनआयए याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List