पोलीस रात्री आरोपीच्या घराचा दरवाजा ठोठावू शकत नाही, हायकोर्टाचा निर्वाळा

पोलीस रात्री आरोपीच्या घराचा दरवाजा ठोठावू शकत नाही, हायकोर्टाचा निर्वाळा

रात्री-अपरात्री आरोपीच्या घरावर धडकणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. पोलिस रात्रीच्या वेळी पाळत ठेवण्याच्या बहाण्याने संशयित किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपीच्या घरात प्रवेश करू शकत नाहीत किंवा दरवाजे ठोठावू शकत नाहीत, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. रात्री उशिरा पोलिसांनी एका आरोपीच्या घराची झडती घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आरोपीने पोलिसांना धमकावल्याचा आरोप होता. संबंधित आरोपीविरोधातील एफआयआर रद्द करताना केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. जी. अरुण यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

घर ही संकल्पना निवासस्थानाच्या भौतिक स्वरुपाच्या पलीकडे आहे हे पोलिसांनी समजून घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला त्याचे घर हे एकतर त्याच्यासाठी मंदिर किंवा किल्ला असते. त्यामुळे कुणा व्यक्तीच्या घराचा दरवाजा ठोठावून त्या घराचे पावित्र्य कलंकित केले जाऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवन जगण्याच्या अधिकारात सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.

सन्मानाने जगण्याच्या अधिकाराशी तडजोड करु शकत नाही, असे खडे बोल न्यायालयाने निर्णय देताना पोलिसांना सुनावले. केरळ पोलिसांची नियमावली देखील अत्यंत स्पष्ट आहे. ती नियमावली देखील पोलिसांना आरोपी वा संशयित गुन्हेगारी व्यक्तीच्या घराचा दरवाजा रात्रीच्या सुमारास ठोठावण्यास मुभा देत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;