IND Vs ENG 1st Test – जसप्रीत बुमराचा भेदक मारा; इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांत गुंडाळला

IND Vs ENG 1st Test – जसप्रीत बुमराचा भेदक मारा; इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांत गुंडाळला

लीड्स येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांमध्ये संपुष्टात आला आहे. जसप्रीत बुमराने भेदक मारा करत इंग्लंडचा अर्धा संघ तंबुत धाडला. टीम इंडियाने पहिल्या डावात 471 धावा केल्या होत्या. त्यामुळे टीम इंडियाकडे आता 6 धावांच आघाडी आहे.

जसप्रीत बुमराने पहिल्या षटकापासून आपल्या गोलंदाजीची धार दाखवण्यास सुरुवात केली होती. पहिल्याच षटकात 4 या धावसंख्येवर जसप्रीतने इंग्लंडला झॅक क्रॉलीच्या स्वरुपात पहिला हादरा दिला. त्यानंतर टप्याटप्याने त्याने इंग्लंडचे मुख्य फलंदाज टिपले. जसप्रीतने आपल्या 24.4 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 83 धावा दिल्या आणि 5 विकेट घेतल्या. जसप्रीतने बेन डकेड (62), क्रिस वोक्स (38) आणि जोश टंग (11) यांचा त्रिफळा उडवला. त्याचबरोबर प्रसिद्ध कृष्णाने 3 आणि मोहम्मद सिराजने 2 विकेट घेतल्या. त्यामुळे इंग्लंडला 465 धावांपर्यंत मजल मारता आली. 400 चा आकडा पार करणं सुद्धा इंग्लंडला कठीण झालं असतं, जर टीम इंडियाने सहा झेल सोडले नसते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;