पोक्सो कायद्याचा दुरुपयोग करत खोटा आरोप, बलात्काराच्या गुन्ह्यातून निष्पाप तरुणाची निर्दोष मुक्तता

पोक्सो कायद्याचा दुरुपयोग करत खोटा आरोप, बलात्काराच्या गुन्ह्यातून निष्पाप तरुणाची निर्दोष मुक्तता

पोक्सो अंतर्गत बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केलेल्या तरुणाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तरुण आणि अल्पवयीन मुलगी एकमेकांचे नातेवाईक आहेत. पीडितेची उलटतपासणी आणि डीएनए चाचणीत तरुणावरील आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले.

काय आहे प्रकरण?

2021 मध्ये मोहोळ तालुक्यातील 17 वर्षे 6 महिने वय असलेल्या मुलीला मासिक पाळी न आल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात तपासण्यासाठी नेले. तेथे तिची सोनोग्राफी तपासणी केली असता ती 15 आठवड्यांची गरोदर असल्याचे दिसून आले. त्यानंतर तिला पुढील तपासणीसाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. ही गरोदर मुलगी अल्पवयीन असल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवले. शासकीय रुग्णालयात तिचा कायदेशीर गर्भपात करण्यात आला.

पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला. यात तिने डिसेंबर 2021 मध्ये नात्यातील तरुणाने ती महाविद्यालयात गेली असताना तिला तलावाकाठी नेले आणि बलात्कार केल्याचे सांगितले. तसेच ही बाब कोणासही न सांगण्याबद्दल दमदाटी केली. यानंतर सदर तरुणाविरोधात बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल होऊन आरोपीस अटक झाली. आरोपीला सात महिने तुरुंगात काढावे लागले.

तपासादरम्यान सदर गर्भधारणा आरोपीपासूनच झाल्याचे सिद्ध करण्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात आली. या टेस्टच्या अहवालात पीडितेने तरुणावर खोटे आरोप केल्याचे सिद्ध झाले. उलट तपासणीत मुलीने गावातील तरुणासोबत आपले शरीरसंबंध झाल्याचे मान्य केले. तसेच वडिलांनी रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून आपण हे कृत्य केल्याचे कबूल केले. यानंतर न्यायलयाने तरुणाची निर्दोष मुक्तता केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;