Ratnagiri News – राजिवडा खाडीलगत नांगरून ठेवलेल्या मच्छीमार नौकेला आग, बोलेरो गाडीही जळून खाक; पाहा Video

Ratnagiri News – राजिवडा खाडीलगत नांगरून ठेवलेल्या मच्छीमार नौकेला आग, बोलेरो गाडीही जळून खाक; पाहा Video

रत्नागिरी शहरानजीक भाट्ये येथील नौका बांधणीच्या कारखान्यात मासेमारी नौका आणि बोलेरो गाडी जळून खाक झाली. ही दुर्घटना रविवारी (22 जून 2025) सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. आग लागताच आकाशात धुराचे लोट पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दुर्घटनेवेळी बोटीच्या डागडुजीचे काम सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या आगीत मच्छिमार नौकेचे जवळपास पाच ते सात लाखांचे नुकसान झाले आहे. भाट्ये येथील नौका मालक आसिफ वस्ता यांनी आपल्या नौकेच्या डागडुजीचे काम हाती घेतले होते. भाट्ये येथे खाडीलगत नौकेच्या डागडुजीचे काम सुरू होते. गॅस वेल्डिंग मशिनच्या माध्यमातून काम सुरू असताना अचानक नौकेने पेट घेतला. शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती घटनास्थळावरील ग्रामस्थानी दिली. नौकेच्या बाजूला बोलेरो गाडी उभी होती. या गाडीनेही पेट घेतला आणि अवघ्या काही कालावधीत नौकेला व गाडीला आगीच्या महाकाय ज्वालानी वेढले.

नौकेला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यांनी भाट्ये येथील पोलीस रोहन गमरे आणि विजय आंब्रे यांना माहिती दिली. त्यांनी शहर पोलीस ठाणे आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण केले. आगीत नौका आणि बोलेरो गाडी पूर्णतः जळून खाक झाली. रविवारी सायंकाळी उशिरा पर्यंत पोलिसांकडून दुर्घटनाग्रस्त बोटीचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;