आम्ही इराणचा अणुकार्यक्रम अनेक वर्षे मागे ढकलला, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष व्हॅन्स यांचे वक्तव्य

आम्ही इराणचा अणुकार्यक्रम अनेक वर्षे मागे ढकलला, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष व्हॅन्स यांचे वक्तव्य

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी इराणवर झालेल्या अमेरिकन हवाई हल्ल्यानंतर पहिले अधिकृत वक्तव्य जारी केले आहे. ते म्हणाले आहेत की, अमेरिकेने इराणचा अणुकार्यक्रम अनेक वर्षे मागे ढकलले आहे. हा हल्ला अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे करण्यात आला.

जेडी व्हॅन्स म्हणाले आहेत की, “इराणवर हवाई हल्ला करण्याचा अंतिम निर्णय अगदी शेवटच्या क्षणी घेण्यात आला. या कारवाईमुळे इराणचा अणुकार्यक्रम अनेक वर्षे मागे गेला आहे”. ट्रम्प प्रशासनाचा इराणमध्ये जमीनी सैन्य पाठवण्याचा कोणताही इरादा नाही, असेही त्यांनी सांगितले.

व्हॅन्स यांनी पुढे म्हटले की, अमेरिका इराणशी दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यास इच्छुक आहे. तसेच आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठीही तयार आहोत. आम्हाला इराणमध्ये सत्तापालट नकोय,” असेही त्यांनी स्पष्ट केले. हा संघर्ष फार काळ टिकणार नाही आणि तो वाढू नये यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;