Latur News – घटस्फोटीत शिक्षिकेवर अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल

Latur News – घटस्फोटीत शिक्षिकेवर अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल

घटस्फोटीत शिक्षिकेशी प्रेमसंबंध साधून जबरदस्तीने त्यांच्याशी शारीरिकसंबंध प्रस्थापित केले. संबंध तुटल्यानंतरही ब्लॅकमेल करत त्रास दिल्याप्रकरणी लातुरात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे तर, एकजण फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोट झालेल्या एका महिला शिक्षकेशी आरोपी संतोष गर्जे याने जवळीक साधली व प्रेमसंबंध निर्माण केले. त्यांच्यावर वारंवार जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. संतोष गर्जे याने कातपूर रोडवरील फ्लॅटवर, तसेच लातूर आणि गोवा येथे नेऊन त्या महिलेवर बलात्कार केला. एवढेच नाही तर कोणाला सांगितल्यास व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रेमसंबंध तुटल्यानंतर त्या महिलेची वारंवार छेड काढून तिला त्रास देण्यात आला. संतोष गर्जे यांचा साथीदार यशवंत जगताप याने त्यांच्या संपर्कात आल्यानंतर तक्रारदार महिलेस वाईट हेतूने स्पर्श करून तिचा अनेक वेळा विनयभंग केला.

पीडितेच्या तक्रारीवरून संतोष गर्जे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यशवंत जगताप याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रेडेकर हे पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी संतोष गर्जे यास अटक केली आहे तर त्याचा साथीदार यशवंत जगताप फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;