गौतम गंभीरची जागा घेण्यासाठी सौरव गांगुली इच्छूक! मुख्यमंत्री होण्याच्या प्रश्नावरही दिलं मजेदार उत्तर

गौतम गंभीरची जागा घेण्यासाठी सौरव गांगुली इच्छूक! मुख्यमंत्री होण्याच्या प्रश्नावरही दिलं मजेदार उत्तर

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखील टीम इंडियाने आतापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. सध्या टीम इंडियाचा इंग्लंड दौरा सुरू असून पहिला कसोटी सामना लीड्स येथे सुरू आहे. याच दरम्यान, टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपण टीम इंडियाच मुख्य प्रशिक्षकपद भुषवण्यास इच्छूक असल्याचं म्हटलं आहे.

सौरव गांगुलीने PTI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलखूलास गप्पा मारल्या. तेव्हा त्याला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकपद होणार का? आणि राजकारणात प्रवेश करणार का? असे प्रश्न विचारण्यात आले. गांगुलीने न डगमगता सर्व प्रश्नांची मुद्देसुद उत्तरे दिली. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर गांगुली म्हणाला की, “मी 2013 साली क्रिकेटमधून निवृत्त झालो आणि त्यानंतर BCCI चा अध्यक्ष झालो. आता पुढे काय होईल हे पुढे पाहू, मी आता फक्त 50 (53) वर्षांचा आहे. मी त्यासाठी तयार आहे. भविष्यात कोणत्या दिशेने जायचं ते पुढे पाहू.” असं गांगुली म्हणाला आहे. त्यामुळे एक प्रकारे सौरव गांगुली टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास इच्छूक असल्याच त्याच्या बोलण्यातून दिसून येत आहे.

IND Vs ENG 1st Test – क्रिकेटविश्वावर शोककळा; इंग्लिश क्रिकेटचा अग्रणी हरपला, दोन्ही संघांनी वाहिली श्रद्धांजली

त्याचबरोबर 2026 साली होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत कोणत्या पक्षात सामील होणार? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. तेव्हा गांगुली हसत हसत म्हणाला की, “मला राजकारणात जराही रस नाही,” मुख्यमंत्री होण्याची ऑफर मिळाली तर? या प्रश्नावरही सौरवने मला राजकारणात रस नाही असच उत्तर दिलं. त्यामुळे सौरव गांगुली राजकारणात दिसणार नाही हे स्पष्ट झालं आहे. परंतु सौरव गांगुलीला भविष्यात टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याची संधी मिळालीच तर, तो नक्कीच मैदानात पुन्हा उतरू शकतो. तसेच गांगुलीने या मुलाखतीमध्ये गौतम गंभीरचही तोंडभरून कौतुक केलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;