इराणला अण्वस्त्रे देण्यास अनेक देश तयार; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर माजी रशियन राष्ट्रपतींचा दावा

इराणला अण्वस्त्रे देण्यास अनेक देश तयार; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर माजी रशियन राष्ट्रपतींचा दावा

रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी एक मोठा दावा केला आहे. अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर काही देश इराणला थेट अण्वस्त्रे पुरवण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिमित्री मेदवेदेव यांनी X वर एक पोस्ट करत असं म्हटलं आहे. ते म्हणाले आहेत की, “अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनासाठी हे हल्ले पुढे जाऊन तोट्याचा करार ठरतील. परंतु या संपूर्ण युद्धानंतर इराणी अधिक मजबूत होईल.”

आपल्या पोस्टमध्ये दिमित्री मेदवेदेव यांनी विचारले की, इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ल्यांमुळे अमेरिकन लोकांना काय मिळाले? त्यांनी स्वतः या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे कोणाला फायदा होईल आणि कोणाला नुकसान होईल हे त्यांनी 10 मुद्द्यांमध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

अमेरिकेच्या हल्ल्यांचा परिणाम काय? दिमित्री मेदवेदेव यांनी मांडले मुद्दे

1. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराणच्या अणुऊर्जा केंद्रांच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे.

2. युरेनियम संवर्धन आणि अण्वस्त्र निर्मितीचे काम सुरू राहील.

3. अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर अनेक देश त्यांचे अण्वस्त्र थेट इराणला पुरवण्यास तयार आहेत.

4. इराणकडून इस्रायलवर जोरदार हल्ला होत आहे, संपूर्ण देश स्फोटांनी हादरत आहे आणि तेथील लोकांमध्ये घबराट पसरली आहे.

5. अमेरिका आता नव्या संघर्षात अडकली आहे, ज्यामुळे जमिनीवर युद्धाची शक्यता वाढली आहे.

6. इराणची राजकीय व्यवस्था स्थिर आहे आणि कदाचित अधिक बळकट झाली आहे.

7. इराणच्या धार्मिक नेतृत्वाला लोकांचा पाठिंबा वाढला आहे, अगदी पूर्वीच्या विरोधकांचाही.

8. डोनाल्ड ट्रम्प हे एकेकाळी ‘शांततेचे राष्ट्रपती’ म्हणून ओळखले जात होते. आता त्यांनी अमेरिकेला आणखी एका युद्धात ढकलले आहे.

9. जगातील बहुतांश देश इस्रायल आणि अमेरिकेच्या कृतींना विरोध करत आहेत आणि इराणला पाठिंबा वाढला आहे.

10. इराणवर हल्ला केल्यानंतर, ट्रम्पने नोबेल शांतता पुरस्कार विसरून जावे.

दरम्यान, रशियाने इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. रशिया आणि इराण अनेक क्षेत्रांत सहकारी आहेत, तर अमेरिका आणि रशियाचे संबंध तणावपूर्ण आहेत. मेदवेदेव यांच्या या दाव्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली असून, यामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;