बोर्डिंग डेडलाइन चुकली, विमान पकडण्यासाठी पठ्ठ्या चक्क रनवेवर धावला; मुंबई विमानतळावरील खळबळजनक प्रकार

बोर्डिंग डेडलाइन चुकली, विमान पकडण्यासाठी पठ्ठ्या चक्क रनवेवर धावला; मुंबई विमानतळावरील खळबळजनक प्रकार

मुंबई विमानतळावर एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. बोर्डिंग डेडलाइन चुकल्याने एक तरुण विमान पकडण्यासाठी चक्क रनवेवर धावल्याची घटना घडली आहे. पियुष सोनी असे या तरुणाचे नाव आहे. विमानतळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पियुष हा कळंबोली येथील रहिवासी असून तो एअर इंडियाच्या विमानाने पाटण्याला चालला होता. यासाठी सकाळी 9.50 वाजता तो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचला. मात्र त्याला विमानतळावर पोहचायला उशीर झाल्याने त्याची बोर्डिंग डेडलाइन चुकली.

विमान उड्डाण घेत असल्याचे समजताच पियुषने गेट क्र 42 आणि 43 दरम्यानच्या आपत्कालीन गेटमधून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर तो सुरक्षारक्षकांना चकवून रनवेवर धावत विमानाचा पाठलाग करू लागला. मात्र पियुष ज्या विमानाच्या मागे धावत होता ते गुजरातमधील भुज येथून आले होते.

सुरक्षा रक्षक आणि सीआयएसएफने पियुषला ताब्यात घेतले. कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल पियुषवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;