हुंड्यासाठी सुनेची हत्या, दोन महिने नातेवाईक आणि पोलिसांची दिशाभूल; पण एक चूक नडली अन् तुरुंगवारी घडली

हुंड्यासाठी सुनेची हत्या, दोन महिने नातेवाईक आणि पोलिसांची दिशाभूल; पण एक चूक नडली अन् तुरुंगवारी घडली

हुंड्यासाठी सुनेची दृश्यमस्टाईलने हत्या केली. मग मृतदेह घरासमोर खड्डा खणून पुरला. यानंतर सून बेपत्ता असल्याचे सांगत दोन महिने नातेवाईक आणि पोलिसांची दिशाभूल केली. अखेर दोन महिन्यांनी प्रकरणाचा छडा लागला. यानंतर सूनेच्या हत्येप्रकरणी सासऱ्याला अटक करण्यात आली.

उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधील तन्नू राजपूतचा 19 मे 2023 रोजी पल्ला येथील अरुणशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी पती-पत्नीमध्ये भांडणं सुरू झाली. नेहमीप्रमाणे 23 एप्रिल 2025 रोजी तन्नू घर सोडून माहेरी निघून गेल्याचे तिच्या सासरच्यांनी माहेरच्यांना कळवलं. मात्र ती माहेरी पोहचलीच नाही. तन्नूचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने माहेरच्यांनी तिच्या हत्येचा संशय व्यक्त केला.

पोलिसांनी सासरच्यांची चौकशी सुरू केली. मात्र दोन महिने सासरच्यांनी पोलीस आणि नातेवाईकांची दिशाभूल केली. मात्र तपासादरम्यान पोलिसांना तन्नूच्या घराबाहेर दोन महिन्यांपूर्वी शौचालय बांधण्यासाठी खड्डा खणल्याची माहिती मिळाली. भूप सिंह यांनी शौचालयासाठी 12 फूट खड्डा खणून घेतला आणि दुसऱ्या तो खड्डा त्यांनी बुजवला, अशी माहिती गवंड्याने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी सदर खोदकाम केले असता तन्नूचा मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी तन्नूच्या सासऱ्याला अटक केली. या गुन्ह्यात सासू, पती, नणंद आणि आत्या सासू यांचाही सहभाग असल्याचा आरोप तन्नूच्या बहिणीने केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;