IND Vs ENG 1st Test – क्रिकेटविश्वावर शोककळा; इंग्लिश क्रिकेटचा अग्रणी हरपला, दोन्ही संघांनी वाहिली श्रद्धांजली

IND Vs ENG 1st Test – क्रिकेटविश्वावर शोककळा; इंग्लिश क्रिकेटचा अग्रणी हरपला, दोन्ही संघांनी वाहिली श्रद्धांजली

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना लीड्स येथे सुरू आहे. या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी एक दु:खद बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज आणि पहिला ब्रिटिश वंशाचा कृष्णवर्णीय खेळाडू डेव्हिड लॉरेन्स यांचे वयांच्या 61 व्या वर्षी निधन झाले आहे. यामुळे दोन्ही संघाचे खेळाडू दंडाला काळ्या पट्ट्या बांधून मैदानातर उतरले व डेव्हिड लॉरेन्स यांना श्रद्धांजली वाहिली.

आपल्या छोट्याशा कारकिर्दीती आपल्या खेळाची छाप फाडणारा खेळाडू म्हणून डेव्हिड लॉरेन्स यांची ख्याती होती. ग्लॉस्टरशायर आणि इंग्लंडसाठी त्यांनी वेगवान गोलंदाजी केली. वेगवान गोलंदाजी आणि अचूक माऱ्यासाठी ते ओळखले जात होते. परंतु दुखापतीमुळे त्यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्दी इतर खेळाडूंप्रमाणे बहरली नाही. डेव्हिड लॉरेन्स यांनी 1988 मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलं. त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये पाच कसोटी सामने खेळले असून 18 विकेट घेतल्या आहेत. तसेच एकमेव वनडे सामन्याच चार विकेट त्यांच्या नावावर आहेत. डेव्हिड लॉरेन्स यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण 515 आणि लिस्ट ए मध्ये 155 गडी त्यांनी तंबूत धाडले आहेत. 1992 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात त्याच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली. यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपूष्टात आली.

इंग्लंडच प्रतिनिधीत्व करणारा पहिला ब्रिटीश वंशाचा कृष्णवंशीय खेळाडू म्हणून त्यांची नोंद ब्रिटिश क्रिकेटच्या इतिहासात कायम राहिल. ECB चे अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन यांनी डेव्हिड लॉरेन्स यांचे वर्णन “इंग्लिश क्रिकेटचा एक अग्रणी, ज्यांचा वारसा खेळावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या हृदयात कायम राहिली.” असे केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;