जगन मोहन रेड्डी यांच्या कारखाली चिरडून YSRCP समर्थकाचा मृत्यू, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

जगन मोहन रेड्डी यांच्या कारखाली चिरडून YSRCP समर्थकाचा मृत्यू, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात वायएसआर काँग्रेस पक्षाचे (YSRCP) अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या गाडीखाली येऊन एका समर्थकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तीचे नाव चिली सिंगैया (वय 55) असे असून, तो रॅलीत जगन मोहन रेड्डी यांच्यावर फुले उधळण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 18 जून 2025 रोजी घडली, असं सांगण्यात येत आहे. जगन मोहन रेड्डी हे येथील रेंटपल्ला गावात एका माजी सरपंचाच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. या सरपंचाने कथितपणे पोलिसांच्या त्रासामुळे आत्महत्या केली होती. सिंगैया हा वेंगलयापलेम गावचा रहिवासी होता आणि जगन यांचे स्वागत करण्यासाठी फुले घेऊन आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगैया गाडीसमोर पडला आणि गाडीच्या उजव्या बाजूच्या चाकाखाली त्याचं मुंडकं येऊन त्याचा मृत्यू झाला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात आणि नंतर गुंटूर सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला, असे गुंटूरचे पोलीस अधीक्षक एस. सतीश कुमार यांनी सांगितले. दरम्यान, या घेतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हारला होत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;