अमेरिकेच्या हल्ल्यानंतर दिल्लीत मोठ्या घडामोडी; पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींना फोन, म्हणाले…

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर दिल्लीत मोठ्या घडामोडी; पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्रपतींना फोन, म्हणाले…

इराण-इस्रायल युद्धामध्ये रविवारी अमेरिकेने उडी घेतली. अमेरिकेच्या ‘बी-2 स्टील्थ बॉम्बर’ विमानांनी इराणच्या तीन आण्विक तळांवर हवाई हल्ले केले. यानंतर इराणनेही अमेरिकेला धमकी दिली. तसेच इस्रायलवरही क्षेपणास्त्र डागले. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानमध्येही मोठ्या घडामोडी घडत आहेत. इराण-इस्रायल युद्धावर हिंदुस्थान बारीक लक्ष ठेऊन आहे. आता अमेरिकेच्या थेट सहभागानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्रिय झाले असून त्यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दुपारी तीनच्या सुमारास आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून इराणच्या राष्ट्रपतींशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती दिली. मी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांच्याशी संवाद साधला. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली, असे मोदींनी सांगितले.

मोदींनी लष्करी संघर्षाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. दोन देशामधील तणाव तात्काळ कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिकतेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहनही मोदींनी केले. तसेच आखाती देशात शांतता, सुरक्षा आणि स्थिरतेवर भर द्यावा, असे आवाहन मोदींनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;