हिंदुस्थानात जाणाऱ्या महिलांनी सुरक्षेची काळजी घ्यावी, ट्रम्प प्रशासनाच्या अमेरिकन नागरिकांना मार्गदर्शक सूचना

हिंदुस्थानात जाणाऱ्या महिलांनी सुरक्षेची काळजी घ्यावी, ट्रम्प प्रशासनाच्या अमेरिकन नागरिकांना मार्गदर्शक सूचना

इराण-इस्रायलमध्ये अमेरिकाही सहभागी झाल्याने जगावर महायुद्धाचे सावट घोंघावू लागले आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामुळे तणाव आणखी वाढला असून काहीतरी मोठे घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच अमेरिकेतली ट्रम्प प्रशासनाने हिंदुस्थानला भेट देणाऱ्या अमेरिकन नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

हिंदुस्थानला भेट देणाऱ्या अमेरिकन नागरिकांसाठी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘लेव्हल-2’ची ट्रॅव्हल मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यात अमेरिकन नागरिकांनी एकट्याने प्रवास करू नये, विशेष करून महिलांनी एकट्याने प्रवास करू नये असे नमूद करण्यात आले आहे. 16 जून रोजी ही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली होती.

अमेरिकन नागरिकांनी हिंदुस्थानात एकट्याने प्रवास करू नये. विशेषत: महिलांनी हिंदुस्थानात एकट्याने प्रवास करू नये. एकट्याने प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या सूचनांमध्ये नमूद केले आहे. हिंदुस्थानमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे म्हणत अमेरिकेने महिलांन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

हिंदुस्थानमध्ये महिलांच्या अत्याचारात वेगाने वाढ झाली आहे. लैंगिक अत्याचारासह अनेक पर्यटनस्थळी हिंसाचाराच्या घटनाही घडत आहेत. जम्मू-कश्मीर, लडाखमध्ये दहशतवाद, असंतोष खदखदत आहेत. तसेच हिंदुस्थानच्या मध्य पूर्व भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. हिंदुस्थानच्या काही भागात खूप बदल होत असल्याने धोका वाढला असून छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मेघालयमध्ये जाण्याआधी मंजुरी घ्या, असेही अमेरिकेने त्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच हिंदुस्थानातून पाकिस्तानमध्ये जातानाही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

B-2 stealth bomber – इराणमध्ये घुसून हल्ला करण्यासाठी अमेरिकेनं ‘बी-2 बॉम्बर’ विमानचं का वापरली? जाणून घ्या वैशिष्ट्य…

गर्दीची ठिकाणं टाळा. दहशतवादी पर्यटन स्थळ, मार्केट, शॉपिंग मॉल, सरकारी संस्थांना लक्ष्य करतात. त्यामुळे हिंसाचारग्रस्त भागात जाताना काळजी घ्या. जम्मू-कश्मीर, हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवरील आणि मध्य व पूर्व हिंदुस्थानातील काही भाग असंवेदनशील असून तिथे जाताना काळजी घ्या. बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मेघालय, ओडिशाचा उल्लेख करत या भागात राजधानी व्यतिरिक्त अन्य ठिकाणी प्रवास करण्याआधी कर्मचाऱ्यांनी परवानगी घ्यावी. तसेच हिंदुस्थान-नेपाळ सीमा पार करू नका. हिंदुस्थानातील कायद्यांचे पाल करा आणि स्थानिक रीतिरिवाजांचा आदर करा असेही आवाहन करण्यात आले आहे.

आता शांततेची वेळ आहे, इराणने युद्ध थांबवावे, अन्यथा विनाश अटळ; ट्रम्प यांचा इशारा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;