परळमध्ये बेस्ट बस आणि टेम्पोचा अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही
मुंबईत सकाळी बेस्ट बस आणि टेम्पोमध्ये अपघात झाला. या अपघातामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला होता, पोलिसांनी वेळीच धाव घेत वाहतूक कोंडी दूर केली. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे बेस्टची बस पाठीमागून आदळली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही आणि बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित होते. मात्र, या अपघातामुळे परिसरात काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अपघातानंतर काही वेळातच मुंबई वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही वाहने रस्त्यावरून हटवण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List