पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी दोघांना अटक, NIA ला मोठे यश

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी दोघांना अटक, NIA ला मोठे यश

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थे (NIA) ला मोठे यश मिळाले आहे. या जीवघेण्या हल्ल्यात सामील असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना लपवून ठेवल्याच्या आरोपावरून दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये पहलगाममधील बटकोट गावातील परवेज अहमद जोथर आणि हिल पार्क येथील बशीर अहमद जोथर यांचा समावेश आहे.

तपास संस्थेनुसार, चौकशी दरम्यान या दोघांनी तीन दहशतवाद्यांबाबत सांगितले आणि ते लश्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित पाकिस्तानी नागरिक असल्याचे उघड झाले. एनआयएच्या तपासानुसार, परवेज आणि बशीर यांनी हल्ल्याच्या आधी हिल पार्क येथील एका झोपडीत या दहशतवाद्यांना जाणीवपूर्वक आसरा दिला होता.

या ठिकाणी राहिल्यानंतर दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या जागेची रेकी केली आणि त्यानंतर हल्ला केला. त्यांनी लोकांचे धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. एनआयएने सांगितले की या दोघांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना अटक करण्यात आली असून सध्या तपास सुरू आहे.

22 एप्रिल रोजी हातात शस्त्रे असलेल्या दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हल्ला केला होता. या वेळी त्यांनी धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीर मधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;