ऐन पालखी सोहळ्यात भाजपचा ‘योगा स्टंट’, पालिकेच्या शाळांमध्ये वारकऱ्यांकडून जबरदस्तीने करून घेतला योग

ऐन पालखी सोहळ्यात भाजपचा ‘योगा स्टंट’, पालिकेच्या शाळांमध्ये वारकऱ्यांकडून जबरदस्तीने करून घेतला योग

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी आहे. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये वारकरी मुक्कामाला असतात. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी आधीच ताण येतो. तरीदेखील ऐन पालखी सोहळ्यात भाजपने जागतिक योग दिवससाठी महापालिकेच्या सर्व शाळांची यंत्रणा कामाला लावली होती. भाजपमुळे पालखी सोहळ्यात पालिकेच्या सर्व शाळांमध्ये जबरदस्तीचा ‘योगा’ करण्याची वेळ आली.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी पुण्यात मुक्कामीदाखल झाल्या. पालख्यांचा शनिवारी मुक्काम पुण्यातच आहे. तब्बल 31 दिवस आळंदी ते पंढरपूर आषाढी पायी वारी व पुन्हा पंढरपूर ते आळंदी असा पालखीचा प्रवास असतो. राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्या संयुक्त वारकरी भक्तियोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शनिवारी जागतिक योग दिवस असल्याने भाजपने वारकऱ्यांबरोबर ‘योग’ करण्याचा ‘इव्हेंट’ सोडला नाही.

भाजपने महापालिकेच्या शाळांची यंत्रणा कामाला लावली होती. महापालिका शाळांमध्ये वारकऱ्यांच्या आंघोळीची अडचण असते. टॉयलेट व इतर सुविधा पुरेशा नसतात. विशेष असे की, पालखी सोहळ्यात त्यांची आंघोळ झाली की, आरती, भजन-कीर्तने असतात. मग ज्यांनी जेवणासाठी बोलाविले असेल किंवा त्यांच्या मुक्कामी स्वयंपाकाची तयारी करावी लागते, अशा वारकत्यांच्या सर्व व्यस्त कार्यक्रमांत ‘योगा’ लावला आहे. जर प्रत्येक गावात भाजप आहे, तर त्याच भागात योग शिक्षण देणे आवश्यक होते. मात्र, वर्षभर कष्ट करणारा वारकरी आपल्या विठ्ठलभेटीला जात असताना भाजपकडून योग दिवसानिमित्त ‘इव्हेंट’ करणे सोडण्यात आले नाही.

पुण्यनगरीत अवतरली ‘पंढरी’! हरिनामाच्या गजरानं शहरातील प्रमुख पेठा गजबजल्या

पालिकेच्या शाळांना वारकऱ्यांसोबत ‘योगा’ करण्याच्या सूचना

सकाळी सात ते साडेआठ वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. सकाळी सात ते पावणेआठ वाजेपर्यंत भजन-कीर्तन करावे. पावणेआठ ते साडेआठ वाजेपर्यंत पाठविलेल्या व्हिडीओप्रमाणे योगाचे सादरीकरण करायचे आहे. वारकरी बांधवांसोबत ‘योगा’ करतानाचे फोटो कमीत कमी पाच काढून ठेवावेत. व्हिडीओ 22 मिनिटांचा असल्यामुळे साडेआठपर्यंत संपेल, योगा संपल्यानंतर रिपोर्टिंगचा गुगल फॉर्म भरायचा आहे. व्हिडीओ शक्यतो टीव्ही किंवा स्क्रीनवर लाबाबा, तो नसेल तर लॅपटॉप किंवा मोबाईलचा वापर करावा, दिलेला बॅनर आपणास दर्शनी स्थळी लावावा, अशा सूचना दिल्या होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;