फेक न्युज पसरवली तर तुरुंगात जाल, कर्नाटकचे काँग्रेस सरकार कायदा आणण्याच्या तयारीत

फेक न्युज पसरवली तर तुरुंगात जाल, कर्नाटकचे काँग्रेस सरकार कायदा आणण्याच्या तयारीत

देशात सोशल मीडियाद्वारे खोट्या बातम्या पसरवण्याचे प्रकार सतत वाढत आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकार अशा खोट्या बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक नवीन कायदा आणण्याच्या तयरीत आहे. भारत फेक न्युज पसरवण्यात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया मंत्री प्रियांक खरगे यांनी दिली.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने अलीकडेच एक विधेयक सादर केले आहे. या विधेयकानुसार खोटी माहिती पसरवणाऱ्याला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो आणि 10 लाख रुपये दंड भरावा लागू शकतो.

या नवीन कायद्याबाबत मंत्री प्रियांक खरगे म्हणाले की, हिंदुस्थान हा फेक न्युजची ‘राजधानी’ बनला आहे. जागतिक Economic Forum नुसार फेक न्युजच्या प्रसारात हिंदुस्थानचा पहिला क्रमांक लागतो. आणि देशातील कायदा व सुव्यवस्थेच्या समस्यांचं हे मुख्य कारण आहे. तसेच लष्कराचा 50% वेळ फक्त अशा फेक न्युजशी लढा देण्यात जातो असे लष्करप्रमुखांनी अलीकडेच सांगितले होते याचीही आठवण खरगे यानी करून दिली.

3M लोकशाहीसाठी घातक
प्रियांक खरगे म्हणाले की निवडणूक आयुक्तांनी आधीच म्हटले आहे की 3M — म्हणजे पैसा (Money), ताकद (Muscle) आणि खोटी माहिती (Misinformation) — हे लोकशाहीसाठी मोठे धोके आहेत. पंतप्रधान मोदी यांनीही म्हटले आहे की खोटी माहिती हे लोकशाहीसाठी घातक आहेत.

जर कोणी सोशल मीडियावरून खोटी माहिती पसरवत असेल, चुकीचा किंवा बनावट रिपोर्ट तयार करत असेल, एखाद्याच्या विधानात फेरफार करत असेल किंवा ऑडियो/व्हिडिओ एडिट करून चुकीच्या पद्धतीने सादर करत असेल, तर त्याच्यावर या कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल अशी तरतूद विधेयकात करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;