मुलीने केला आंतरजातीय विवाह, कुटुंबातील 40 सदस्यांचे जबरदस्तीने केले टक्कल

मुलीने केला आंतरजातीय विवाह, कुटुंबातील 40 सदस्यांचे जबरदस्तीने केले टक्कल

एका मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावातील लोकांनी मुलीच्या कुटुंबातील 40 सदस्यांचे जबरदस्तीने टक्कल केले आहे. इतकंच नाही तर या कुटुंबाला गावाने वाळवीत टाकलं आहे. शुद्धीकरणाच्या नावाने या सदस्यांचे जबरदस्तीने टक्कल करण्यात आले आहे. ओडिशामधील रायगड जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बैगनगुडा गावातील तरुणीने शेजारच्या गावातील अनुसूचित जातीतील तरुणाशी प्रेमविवाह केला. हा विवाह गावातील जातिव्यवस्थेच्या तथाकथित नियमांनुसार चुकीचा मानला गेला. त्यामुळे मुलीच्या कुटुंबावर आणि नातेवाइकांवर प्रचंड सामाजिक दबाव टाकण्यात आला.

गावकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर हे कुटुंबांना पुन्हा त्यांच्या जातीत परतायचे असेल, तर त्यांना पारंपरिक शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यामध्ये जनावरांचे बलिदान आणि 40 लोकांचे जबरदस्तीने मुंडण करावे लागणार होते. असे न केल्यास संपूर्ण गाव त्यांना वाळीत टाकेल अशी धमकी गावकऱ्यांनी दिली होती. त्यामुळे दबावाखाली येऊन मुलीच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांची ही बाब ऐकावी लागली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. तसेच पोलिसांनी या ठिकाणी जाऊन तपासही सुरू केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;