अर्वाच्च शिवीगाळ, कानाखाली मारली; नियम मोडल्याचा जाब विचारल्यानं कल्याणमध्ये दुचाकीस्वाराचा वाहतूक पोलिसावर हल्ला

अर्वाच्च शिवीगाळ, कानाखाली मारली; नियम मोडल्याचा जाब विचारल्यानं कल्याणमध्ये दुचाकीस्वाराचा वाहतूक पोलिसावर हल्ला

विरुद्ध दिशेने आल्याचा जाब विचारला म्हणून दुचाकी चालकाने वाहतूक पोलिसाला अर्वाच्च शिविगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार शहाडमध्ये घडला. या प्रकरणी वाहतूक पोलीस सचिन बबन ओमासे (वय – 33) यांनी महात्मा फुले चौक पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 121(1), 132, 351(2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

फिर्यादी सचिन ओमासे हे कल्याण वाहतूक शाखेमध्ये गेल्या तीन वर्षापासून कार्यरत आहेत. शनिवारी रात्री ते कल्याण स्टेशन परिसरात वाहतूक नियम करत असताना शहाड ब्रिजवर वाहतूक कोंडी झाल्याची माहिती त्यांना ठाणे अंमलदाराने दिली. त्यामुळे ते शहाड जकात नाका येथे पोहोचले.

शहाड ब्रिजवर एक दुचाकी (क्र. एमएच 05, एफएल 9314) ही विरुद्ध दिशेने येत होती. ओमासे यांनी त्यास जाब विचारत गाडी बाजूला घेण्यास सांगितले. मात्र दुचाकीस्वाराने नकार दिल्याने वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी ओमासे यांनी स्वत: ही दुचाकी बाजूला घेतली. याचा राग आल्याने दुचाकीस्वारने ओमासे यांच्या अंगावर धावून जात त्यांना अर्वाच्च शिविगाळ केली आणि मारहाण केली. तसेच ‘मी गाववावा केणे असून तुम्हाला बघून घेईन’, अशी धमकी देत रस्त्यावरील दगड उचलून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूच्या लोकांना त्याला रोखले, अशी फिर्याद ओमासे यांनी दिली असून पोलिसांनी दुचाकी चालक केणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;