हल्ला अमेरिकेचा, प्रत्युत्तर इस्रायलला; चवताळलेल्या इराणनं डागली धडाधडा 30 क्षेपणास्त्र
अमेरिकेने रविवारी सकाळी इराणमध्ये घुसून हवाई हल्ले केले. इराणच्या तीन आण्विक तळांवर अमेरिकेने हल्ला करत ते उद्ध्वस्त केले. या हल्ल्यांमुळे इराण चांगलाच चवताळला असून अमेरिकेला बदला घेण्याची धमकी दिली आहे. एवढेच नाही तर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवरील हल्ले तीव्र करत धडाधड 30 क्षेपणास्त्र डागली. इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि जेरुसलेमला लक्ष्य करत ही क्षेपणास्त्र डागण्यात आली असून यात मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांची इस्रायलच्या डिफेन्स फोर्सनेही केली आहे.
Sirens sounding across Israel due to another Iranian missile launch
— Israel Defense Forces (@IDF) June 22, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.

Comment List