अर्नाळ्यात अबोली रिक्षाला एसटीची धडक, एक महिला जागीच ठार, एक जण गंभीर
वसई, मनीष म्हात्रे
अर्नाळा येथे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास अर्नाळा शिर्डी बसने अर्नाळा लक्ष्मण रोड सोसायटी येथे समोरून येणाऱ्या महिला रिक्षाला जोरदार धडक दिली. यात कविता नितीन कोलगे (राहणार जुना कोळीवाडा ,वय वर्ष 55) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मीनाक्षी योगेश पाटील( विरार पूर्व )या गंभीर जखमी झाल्या आहेत. सदर बसचा चालक राजू शंकर गांगुर्डे (राहणार मनमाड ) हा घटनास्थळावरून अपघात झाल्यानंतर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
महिला रिक्षा चालक पूनम वरठा ही कविता कोलगे, मीनाक्षी पाटील व शिल्पा राऊत या प्रवाशांना घेऊन आगाशी येथून अर्नाळा येथे जात होत्या. तेव्हा अर्नाळा लक्ष्मण रोड सोसायटी समोर विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या एसटी महामंडळाच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली. यात कल्पना कोलगे यांचा धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला, तर मीनाक्षी पाटील यांचा पाय तुटल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना त्वरित विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात आरोपी चालक राजू गांगुर्डे यांच्या विरोधात महिला रिक्षाचालक पुनम वरठा यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपघातात मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List