इराण-इस्रायल युद्धात अमेरिका उतरल्याने जागतिक शांततेला धोका; अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली चिंता

इराण-इस्रायल युद्धात अमेरिका उतरल्याने जागतिक शांततेला धोका; अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली चिंता

अमेरिकेने आता इस्रायल आणि इराणमधील युद्धात प्रवेश केला आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अण्वस्त्र केंद्रे फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान यांना लक्ष्य केले. इस्रायलने अमेरिकेच्या या कारवाईचे कौतुक केले आहे. तर संयुक्त राष्ट्रांनी अमेरिकेच्या कारवाईवर चिंता व्यक्त केली आणि म्हटले की आता हा संघर्ष हाताबाहेर जाण्याचा धोका वेगाने वाढत आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण झाला आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले, अमेरिकेने इराणविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईबद्दल ऐकून मला खूप चिंता वाटली. आधीच तणावाच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रदेशात ही एक धोकादायक चिथावणीखोर कृती आहे आणि ती आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी थेट धोका आहे. हा संघर्ष नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका वेगाने वाढत आहे. त्याचा केवळ सामान्य नागरिकांवरच नाही तर संपूर्ण प्रदेश आणि संपूर्ण जगावर विनाशकारी परिणाम होऊ शकतो. मी सर्व सदस्य देशांना तणाव कमी करण्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनद आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या इतर नियमांनुसार त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे आवाहन करतो, असे गुटेरेस म्हणाले.

या अत्यंत संवेदनशील वेळी अराजकता टाळणे खूप महत्वाचे आहे. या संकटावर कोणताही लष्करी उपाय नाही. पुढील मार्ग म्हणजे फक्त राजनैतिकता आणि शांतता हीच एकमेव आशा आहे. अमेरिकेच्या कारवाईमुळे तणाव वाढला आहे. आता युद्धाची तीव्रता वाढण्याचाही धोका आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांतील देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;