B2 stealth bomber – इराणमध्ये घुसून हल्ला करण्यासाठी अमेरिकेनं ‘बी2 बॉम्बर’ विमानचं का वापरली? जाणून घ्या वैशिष्ट्य…
इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली आहे. रविवारी सकाळई अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर हवाई हल्ले केले. इराणमधील फोर्डो, नतांझ आणि इस्फाहान या आण्विक तळांना नष्ट करण्यासाठी अमेरिकेने ‘बी-2 स्टील्थ बॉम्बर’ विमाने पाठवली होती. या विमानांनी आपले काम अचूक पार पाडले आणि इराणच्या हवाई हद्दीतून सुरक्षित बाहेरही आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच याबाबत माहिती दिली. मात्र इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करण्यासाठी ‘बी-2 स्टील्थ बॉम्बर’ ही विमानेच का वापरण्यात आली? या विमानांचे वैशिष्ट्य काय आहे? ही विमाने किती घातक आहेत? हे जाणून घेऊया.
बी-2 स्पिरिट हे एक अमेरिकन स्टील्थ बॉम्बर विमान आहे. नॉर्थ्रॉप ग्रुम्मन या संरक्षण क्षेत्रातील अमेरिकन कंपनीने हे विमान विकसित केले आहे. ‘बी-2 बॉम्बर’ या नावाने ओळखले जाणारे हे जगातील सर्वात महागडे लढाऊ विमान आहे. हे विमान अत्याधुनिक स्टील्थ तंत्रज्ञानाने बनवण्यात आले असून लांब पल्ल्याचे उड्डाण आणि प्रचंड प्रमाणात हत्यारं घेऊन जाण्यास सक्षम आहे. 1980 च्या दशकामध्ये हे विमान डिझाई करण्यात आले होते आणि 1997 ला सेवेत आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List