छत्तीसगडमध्ये सात नक्षलवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाला मोठे यश
बीजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क परिसरात सुरक्षा दलाला माओवादीविरोधी मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत सात माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यात माओवाद्यांमध्ये बड्या नेत्यांचाही समावेश आहे.
या सात जणांपैकी दोन जणांची ओळख पटली असून, त्यात गौतम उर्फ सुधाकर आणि भास्कर राव यांचा समावेश आहे. या दोघांचा मृत्यू माओवादी संघटनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. इतर मृतांपैकी एकाची ओळख महेश कोडियम म्हणून झाली आहे. तो इरपागुट्टा गावाचा (थाना फरसगड, बीजापूर) रहिवासी होता. महेश भाकपा (माओवादी) संघटनेचा सक्रिय सदस्य होता आणि ते नॅशनल पार्क क्षेत्र भागात काम करत होते.
महेश कोडियम इरपागुट्टा गावाच्या प्राथमिक शाळेत स्वयंपाक सहाय्यक म्हणून काम करत होता. त्याची नेमणूक शाळा व्यवस्थापन समितीने केली होती आणि मार्च 2025 पर्यंत त्याला वेतनही देण्यात आले होते. एक सरकारी शाळेचा कर्मचारी, जो सार्वजनिक सेवेत होता, तो बंदी घालण्यात आलेल्या संघटनेत कसा सामील झाला आणि तो माओवादी नेत्यांच्या संपर्कात कसा आला याचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी सर्व बाजूंनी गंभीर, निष्पक्ष आणि व्यावसायिक तपास सुरू केला आहे. तसेच, पोलिसांनी पुन्हा एकदा जनतेला आवाहन केले आहे की, जे कोणी कोणत्याही प्रकारे माओवादी संघटनेशी संबंधित आहेत, त्यांनी तात्काळ त्या संघटनेपासून दूर व्हावे. पोलिसांनी इशारा दिला आहे की माओवादी संघटनेशी संबंध ठेवणे केवळ परिसराच्या सुरक्षेसाठी नाही, तर संबंधित व्यक्तीच्या आयुष्याला आणि भविष्यासुद्धा धोकादायक ठरू शकते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List