इतिहास घडवणारा धाडसी निर्णय, शक्तीनेच शांतता प्रस्थापित होते; अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यांनंतर नेत्यानाहू गरजले

इतिहास घडवणारा धाडसी निर्णय, शक्तीनेच शांतता प्रस्थापित होते; अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यांनंतर नेत्यानाहू गरजले

अमेरिकेने इराणच्या तीन महत्त्वाच्या अण्विक तळांवर बॉम्बहल्ला टाकल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इतिहास घडवणारा हा धाडसी निर्णय असून आधी शक्ती दाखवली तर शातंता प्रस्थापित होते. शक्तीनेच शांतता प्रस्थापित होते, असे नेत्यानाहू यांनी म्हटले आहे. अमेरिकेने केलेली कारवाई इतिहास बदलणारे धाडसी पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प आणि मी अनेकदा म्हणतो ‘शांतता केवळ शक्तीने येते.’ प्रथम शक्ती दाखवली जाते, नंतर शांतता प्रस्थापित होते. आता अमेरिका थेट या युद्धात उतरल्याने युद्धाची तीव्रता वाढणार आहे.

अमेरिकेने इराणच्या तीन अम्वस्त्र केंद्रावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यानंतर नेतान्याहू आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्यावेळी नेत्यानाहू यांनी अमरिकेच्या कारवाईबाबत आभार व्यक्त केले. डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेने प्रचंड ताकदीने इराणवर हल्ले केले. ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की फोर्डोवर सहा बंकर-बस्टर बॉम्ब टाकण्यात आले, तर इतर अणुस्थळांवर 30 टोमाहॉक क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

अभिनंदन, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प. अमेरिकेच्या अद्भुत आणि नीतिमान सामर्थ्याने इराणच्या अणु सुविधांना लक्ष्य करण्याचा तुमचा धाडसी निर्णय इतिहास बदलेल,असे नेतान्याहू म्हणाले. ऑपरेशन रायझिंग लाईनमध्ये, इस्रायलने सामर्थ्य दाखवले आहे. मात्र, इराणच्या अण्वस्त्र केंद्रावरील कारवाईत अमेरिकेने अतुलनीय धाडस दाखवले आहे. पृथ्वीवरील इतर कोणताही देश करू शकला नाही, ते अमेरिकेने केले आहे. इतिहासात याची नोंद होईल,असे ते म्हणाले.

ट्रम्प यांच्या नेतृत्वाने इतिहास रचला आहे. त्यामुळे आखाती देश आणि त्यापलीकडे समृद्धी आणि शांतीच्या भविष्याकडे नेण्यास मदत करू शकतो. देव अमेरिकेला आशीर्वाद देवो. देव इस्रायलला आशीर्वाद देवो. देव आमच्या अढळ युतीला, आमच्या अतूट विश्वासाला आशीर्वाद देवो,” असे ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;